जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी राज्यस्तरीय आंतर जिल्हा खुला गट महिला फुटबॉल स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा महिला फुटबॉल संघाची निवड चाचणी येत्या १५ मे पासून जळगावात आयोजित करण्यात आली आहे.
पालघर येथे होणाऱ्या या प्रतिष्ठित स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक महिला खेळाडूंची निवड प्रक्रिया श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे सकाळी ७ ते ९ या वेळेत पार पडणार आहे.

जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष प्रा. डॉ. अनिता कोल्हे आणि सचिव फारूक शेख यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. या पत्रकानुसार, निवड चाचणीसाठी येणाऱ्या खेळाडूंनी आपले जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड सोबत आणणे अनिवार्य आहे.
इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीच्या दिवशी सकाळी ७ वाजता क्रीडा संकुलात उपस्थित राहून हिमाली बोरोले, गुंजा विश्वकर्मा, छाया पाटील, वर्षा सोनवणे, राहील शेख आणि वसीम शेख यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, आपले नाव त्वरित सीएसआरमध्ये नोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. जळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळवण्यासाठी जास्तीत जास्त महिला खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा फुटबॉल संघटनेने केले आहे.


