रिना माळी यांची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदी निवड

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रिना मधुकर माळी यांची महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागातर्फे वर्ग -3 प्राथमिक आरोग्य केंद्र चहार्डी ता.चोपडा येथे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया पदी निवड झाल्याने तीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील रिना माळी यांचे प्राथमिक शिक्षण कळमसरे ता. अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत तर इयत्ता दहावी पर्यंत कळमसरेतीलच माध्यमिक शिक्षण शारदा माध्यमिक विद्यालयात होऊन उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण प्रताप महाविद्यालयात झाले. रिना माळी यांनी बी. एस .सी .व एम एस. सी. मायकोबाँलायजी प्रताप महाविद्यालयात शिक्षण घेऊन धुळे येथील विदयासागर इन्टिट्युट येथे पी. जी. डी. एम.एल .टी. करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला. हा अभ्यास करीत असतांना सरळ सेवा अंतर्गत डिसेंबर 2023 मध्ये ह्या पोस्टची परीक्षा तिने दिली होती. यात त्यांना यश मिळाले असून तिची प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी मलेरिया म्हणून चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात निवड झाली आहे.

रिना ही मधुकर यशवंत माळी यांच्या कन्या आहे. तिने हे यश मिळविल्याने यावेळी तिचे वडील व आई यांचेही सर्वत्र कौतुक होत आहे. रिना हिला तिचे काका एल. आय. सी. एजंट व पत्रकार बाबुलाल पाटील तिचा मोठा भाऊ स्वप्निल माळी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तालुक्यातुनच नव्हे तर संपूर्ण जळगाव जिल्ह्यातुन रीना यांचे माळी समाजातील पहिलीच महिला वैज्ञानिक अधिकारी म्हणून निवड झाल्याने कळमसरे करांचा शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. रिना माळी यांच्या या स्पर्धा परीक्षे अंतर्गत निवड झाल्याने कळमसरे ग्रामस्थ व तालुक्यातून सर्वत्र कौतुक व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Protected Content