खुशखबर : ऑनलाईन रोजगार मेळाव्यातून मिळणार नोकरी !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयातर्फे २५ ते २७ ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेे आहे.

कोविड विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा ऑनलाईन या प्रकारात होणार आहे. विविध कंपन्या, आस्थापनांमधील ३१० रिक्त पदांसाठी हा मेळावा होत आहे. या मेळाव्यात रोजगार देणार्‍या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रोजगार, महास्वयंरोजगारच्या वेब पोर्टलवर विविध शैक्षणिक पात्रतेची रिक्तपदे अधिसूचित केली आहेत.

वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी मॅचिंग होणार्‍या किंवा ऑनलाइन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखतींसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी वेबपोर्टलला लॉग-इन करून लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

Protected Content