मु.जे. महाविद्यालयात ‘सर्व्हायव्हल स्कील’ विषयावर व्याख्यान

14

जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. संचालित मु. जे. स्वायत्त महाविद्यालयातील स्कुल ऑफ कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट मध्ये ‘सर्व्हायव्हल स्कील’या विषयावर एक व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानाला हिमाचल प्रदेश विद्यापीठ बिझनेस स्कुल सिमला येथील वाणिज्य प्रमुख डॉ. पवन गर्ग प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.डी. कुलकर्णी आणि डॉ. एस. एन. भारंबे, स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे संचालक सी.ए.वाय ए. सैंदाणे, वाणिज्य विद्याशाखा प्रमुख डॉ.ए.पी.सरोदे, व्यवस्थापन विद्याशाखा प्रमुख सी.ए.एन. अरसीवाला, तसेच प्राध्यापक एस.पी.पालवे, विभाग प्रमुख अकाउंटिंग ॲण्ड कॉस्टिंग, उपस्थित होते.

व्याख्यान देतांना डॉ. गर्ग यांनी वेळेचे व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे असे सांगितले, सोशल मीडियावर वेळ घालवण्यापेक्षा शिक्षकांसोबत महत्वाच्या विषयावर सुसंवाद साधने, पुस्तके-वर्तमानपत्रे वाचणे, वक्तशीरपणा आचरणात आणणे. या सारख्या उत्पादक कार्यावर लक्षकेंद्रित करणे महत्वाचे आहे. या आधारावरच आजच्या स्पर्धात्मक जगात आपल अस्तित्व टिकवून ठेवणे सोपे होते .. या कार्यक्रमाला स्कुल ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंटचे विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते, या कार्यक्रमासाठी सर्व प्राध्यापक वृंदाचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content