सोनिया गांधींच्या नेतृत्वात विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले

Sonia Gandhi

नवी दिल्ली वृत्तसंस्था । नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे देशाच्या बर्‍याच भागात हिंसक आंदोलन सुरू आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींनी यात हस्तक्षेप करावा आणि कायदा मागे घ्यावा, अशी मागणी आज केली आहे.

सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाचं शिष्टमंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटले. या शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना नागरिकत्व कायदा आणि देशात सुरू असलेल्या आंदोलनाची माहिती दिली. या कायद्यामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हा कायदा मागे घेण्याचा सरकारला सूचना करण्यात यावी, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यात आलेली आहे, असे समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांनी सांगितले आहे.

Protected Content