Home Cities जळगाव भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे महामृत्युंजय जप व हवनाचे आयोजन

भाजपा आध्यात्मिक आघाडीतर्फे महामृत्युंजय जप व हवनाचे आयोजन

0
31


जळगाव,  प्रतिनिधी । पिंप्राळा येथील प्रल्हाद नगर परिसरात भारतीय जनता पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीतर्फे कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी महामृत्युंजय जप व हवनाचे आयोजन आज सकाळी ७ ते १२ या वेळेत करण्यात आले होते. 

 

तसेच हवनासाठी बाबासाहेब भगवान बसुगडे सपत्निक बसले होते. या कार्यक्रमाचे पौरोहित्य वे. शा. स. परमेश्वर धर्माधिकारी, अक्षय रविंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ललित जाधव व आरती जाधव, विद्या जगताप, विजया धर्माधिकारी, हेमलता जोशी, हर्षादा कुळकर्णी, मलकापूरकर साहेब आदींनी परिश्रम घेतले. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन आध्यात्मिक आघाडीचे महानगर अध्यक्ष हेमंत जोशी यांनी केले होते.


Protected Content

Play sound