राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी खेळाडू कृष्णा राठोडची निवड

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ध्यानचंद स्पोर्ट्स अकॅडमी जळगाव व हॉकी जळगांव संघटनेचा खेळाडू तथा नूतन मराठा कनिष्ठ महाविद्यालयातील १२ वी वाणिज्य शाखेतील विद्यार्थी कृष्णा विट्ठल राठोड याची १७ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झालेली आहे. .

कृष्णा राठोडला प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख यांच्यासह राज्य क्रीडा मार्गदर्शक अरविंद खांडेकर, प्रशिक्षक सय्यद लियाकत अली, सत्यनारायन पवार व मजाज खान यांचे मार्गदर्शन लाभले.

त्याच्या निवडीबद्दल हॉकी महाराष्ट्र च्या उपाध्यक्ष प्रा डॉ अनिता कोल्हे यांनी त्यांचा पुष्पगुच्छ व क्रीडा साहित्य देऊन हॉकीच्या क्रीडांगणावर हॉकी जळगाव व इतर खेळाडू समक्ष सत्कार केला यावेळी हॉकी जळगाव चे सचिव  फारुक शेख,राष्ट्रीय पोलीस खेळाडू सैयद रज्जाक, मनोज सुरवाडे, विकार शेख,इरफान शेख, सत्यनारायण पवार, मजाझ शेख व दिवेश चौधरी आदी उपस्थित होते.

Protected Content