भुसावळ प्रतिनिधी । रामावरच्या अढळ श्रद्धेची कुंभारखेड्यात जगावेगळी प्रचिती कोष्टी दाम्पत्याला आली अन त्यांच्यासाठी स्वप्नवत असलेले सुविधांनी सज्ज असे पक्के घर त्यांना यंदा गुढीपाडव्याच्या दिवशी ताब्यात मिळाले ! या कथेचे खरे नायक ठरले उद्योजक अश्विनकुमार परदेशी !
रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावात कुडाच्या भिंती व छप्पर असलेल्या घरात पत्नीसोबत कुठल्याही चैनीच्या वस्तूची आशा न बाळगता व वीजही न वापरता आतापर्यंतचे आयुष्य अंधारात काढलेल्या कोष्टी परिवाराला प्रभू श्रीरामांमुळे स्वतःचे घर मिळाले ! गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सरपंच यांच्या उपस्थितीत नारायण सखाराम कोष्टी व पत्नी यांच्या हस्ते फित कापण्यात आली
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी कार्यकर्ते निधी संकलन करीत होते कुंभारखेडा गावी कार्यकर्ते गेले त्या गावातील नारायण सखाराम कोष्टी ( वय ८७ ) यांनी परिस्थिती नसतांना डब्यातील तीन – चार पिशव्यामधून शंभर रुपयांची नोट काढून निधी संकलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटले गावात भिक्षा मागून परिवाराचा गाडा ओढणारे नारायण कोष्टी खरोखरच रामांवर एवढे प्रेम करीत असतील हे तोंडात बोट टाकणारे उदाहरण आहे.असे त्यांनाही वाटले
या प्रसंगाची चित्रफीत कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये तयार करून युट्यूबवर लोड केली.. ती एवढी व्हायरल झाली की,राज्यभर पोहचली शेवटी भुसावळ शहरातील व्ही.आय. पी.कॉलनीतील अश्विनकुमार परदेशी ( उद्योजक ,औरंगाबाद ) यांच्या हाती तो व्हिडिओ लागला त्यांनी व्हिडीओ पाठवणाऱ्या मित्राकडे विचारणा केली जळगांव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावातील असल्याचे त्यांना समजले
अश्विन कुमार परदेशी यांच्या एका मित्राची कुंभारखेडा सासरवाडी येथील असल्याने त्यानी विलंब न करता चारचाकी काढली व थेट या गावातील ग्रामपंचायत कार्यालय गाठले. सरपंच लताबाई टोपा बोंडे यांची भेट घेतली व नारायण कोष्टी यांनी सरकारी योजनांचा लाभ घेतल्याबाबत विचारणा केली सर्व योजना मंजूर असून पण या परिवाराने लाभ घेऊन कुठे सरकारचा पैसा खर्च करायचा ? , याचा विचार करून एकही योजनेचा लाभ घेतला नाही. भिक्षा मागून घराचा उदरनिर्वाह करीत आहेत असे त्यांना समजले . .
त्यानंतर “देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो” असाच प्रकार नारायण कोष्टी यांच्या सोबत घडला. नारायण कोष्टी यांनी विचारही केला नसेल की ज्या प्रभू श्रीरामांसाठी शंभर रुपये दिले त्या श्रीरामांनी बदल्यात छपराचे घर आरसीसीचे करून दिले. सुदामा कृष्ण भेटीसाठी पोहे घेऊन गेले भेट झाल्यानंतर सुदामाची सर्व नगरी कृष्णाने सोन्याची बनविली. तसेच नारायण कोष्टी यांचे छपराचे घर अश्विनकुमार परदेशी यांनी दोन लाख रुपये खर्चून पक्के घर करून दिले
पंधरा दिवसात हे पक्के घर बांधून गुढी पाडव्याच्या मुहर्तावर सरपंच लताबाई बोंडे यांच्या उपस्थितीत नारायण कोष्टी व पत्नी यांच्या हस्ते फित कापली. नारायण कोष्टी यांना दोन ड्रेस व त्यांच्या पत्नीला दोन साड्या व साहित्य उद्योजक अश्विन कुमार परदेशी यांनी दिले.
या कामात भाग्येश चौधरी, कल्पेश इंगळे, सचिन पाटील, चंदन महाजन, कुणाल पाटील, लोकेश राणे यांनी अश्विनकुमार परदेशी यांना सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले असे ग्रामस्थ आवर्जून सांगतात .खरतर स्थानिक आमदारांनी पुढाकार घेण्याची गरज होती अशी खंतही व्यक्त होत होती