बनावट आरटीपीसीआर प्रकरणातील दुसरा संशयित आरोपीला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बनावट आरटीपीसीआर अहवाल देणारा मुख्य संशयित आरोपीला अटक करण्यात जिल्हा पेठ पोलीस कर्मचाऱ्यांना यश आले आहे. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील (वय-२८, रा. धानवड ता. जळगाव ) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हा वैद्यकीय रुग्णालयात कोरोनाची चाचणी न करता कुठल्याही स्वॅब न घेता तीनशे रुपयात कोरोनाचा बनावट आरटीपीसीआर चाचणीचा बनावट अहवाल मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणात त्रिस्तरीय चौकशी समितीने  चौकशी करुन त्याचा अहवाल दिला होता. यात प्रथमदर्शी सुरक्षा रक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे रा. जळके विटनेर ता. जि.जळगाव आणि लॅबमधील डाटा एन्ट्री ऑपरेटर स्वप्निल पांडूरंग पाटील हे दोघ संशयित असल्याचे आढळून आले होते. याप्रकरणी ६ फेब्रुवारी रोजी दोघांविरुद्ध जिल्हापेठ गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील संशयित आरोपी सुरक्षा रक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे याला ९ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. तर मुख्य संशयित आरोपी स्वप्निल पाटील हा फरार होता.

 

दरम्यान मुख्य संशयित आरोपी स्वप्निल पांडूरंग पाटील हा धानवड ता. जळगाव हा गावात असल्याची गोपनिय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी २१ फेब्रुवारी पोलीसांनी अटक केली आहे. त्याला न्यायमुर्ती विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content