वाघनगरातील विवेकानंद शाळा व महाविद्यालयात ‘वाचनातून प्रेरणा’ यावर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । वाघनगरातील विवेकानंद प्राथमिक शाळा व वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक, अर्थतज्ञ, दिग्दर्शक, सिनेअभिनेते माननीय दीपक करंजीकर यांचे वाचनातून प्रेरणा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

देशाचे माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ज्येष्ठ लेखक, अर्थतज्ञ, दिग्दर्शक, सिनेअभिनेते माननीय दीपक करंजीकर यांचे वाचनातून प्रेरणा या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. महान व्यक्तींच्या आयुष्यात वाचनामुळे घडलेले संस्कार तसेच वाचन महत्त्वाचे का आहे ? ते महत्त्वाचे आहे कारण वाचन ही सवय आहे. जी आपल्याला एक चांगली व्यक्ती बनू शकते. महान व्यक्तींच्या जीवनातून आपल्यालाही शिकायला मिळते त्यांच्यापैकी बहुतेक यापासून प्रेरणा मिळाल्यामुळे जीवनात यशस्वी झाले आहे. वाचनाद्वारे ज्ञानाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात क्षमता वाढवली आहे. वाचन मध्ये अनेक गुण आहेत की जे आपल्याला बाहेर जगाशी जोडून ठेवते. आपला शब्दसंग्रह, समृद्ध आणि विस्तारित करते आणि एकाग्रतेची कौशल्य विकसित करते.वाचन आपल्याला तीव्र आनंद ,शुद्ध आनंद प्रदान करते. ते आपल्याला विचारांच्या गहनतेसह आणि भावनिक रंगाचे विस्तृत मिश्रण संवाद साधण्यास मदत करते म्हणूनच विद्यार्थ्यांची वाचनाची सवय वाढावी यासाठी वाचन प्रेरणादिनी विवेकानंद प्रतिष्ठान प्राथमिक शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

वाचन प्रेरणा दिवसानिमित्त डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम वाचन कट्टा तयार करण्यात आला होता. तसेच मुख्याध्यापक हेमराज पाटील, ग्रंथपाल हितेश ब्रिजवासी यांच्याहस्ते ग्रंथ पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना विविध ग्रंथ, पुस्तक यांची माहिती व्हावी या दृष्टीने ग्रंथालयांमध्ये पुस्तक प्रदर्शनही मांडण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्याने एक पुस्तक वाचन करावे, एक व्यक्ती एक पुस्तक वाचन व्हावे हा उद्देश ठेवून विद्यार्थ्यांच्या वयाला अनुरूप होतील अशी पुस्तके तंत्रज्ञान आणि ई ग्रंथालय , पी डी एफ पुस्तके इत्यादींचा वापर करून विद्यार्थ्यांना या दिवशी उपलब्ध करून देण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय दीपाली सहजे तर पुस्तक प्रदर्शनीसाठी योगेश रत्नपारखी, उमेश पाटील, सोनाली कुलकर्णी, वैभव काष्टे, आकाश शिंगाणे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माननीय मुख्याध्यापक हेमराज पाटील यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे नियोजन सचिन गायकवाड , हितेश ब्रिजवासी यांनी केले. तसेच समन्वयिका वैशाली पाटील व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे समारोपीय भाषण माननीय मुख्याध्यापक हेमराज पाटील सर यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Protected Content