अखेर शिल्पकार जयदीप आपटेला अटक; मिळाली पाच दिवसांची कोठडी

मुंबई लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या प्रकरणात अखेर १० दिवसानंतर शिल्पकार जयदीप आपटे याला पोलीसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. बांधकाम सल्लगाार चेतन पाटील आणि जयदीप आपटे यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मालवण येथे नऊ महिन्यांपुर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक बनविण्यात आले होते. या स्मारकाने उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. परंतू ९ महिन्याच हा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या मुळे संपुर्ण महाराष्ट्रात शिवप्रेमींनी संताप व्यक्त करण्यात आला. याप्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून जयदीप हा फरार झाला होता.

कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेला आपटे पोलिसांच्या अलगद हाती लागला. जयदीप आपटे कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यासाठी एक पथक कल्याणच्या रेल्वे स्टेशनवर आणि दुसरं पथक कल्याणच्या पाहत्या घराबाहेर होतं. जयदीप आपटे कसाऱ्यावरून लोकल ट्रेन पकडून कल्याणला आला. कल्याण रेल्वे स्टेशनवर उतरून जयदीप ऑटोने दूध नाका परिसरात आला. कोणी ओळखू नये म्हणून त्याने डोक्यावर टोपी आणि तोंडाला रूमाल गुंडाळला होता. सोबत दोन बॅगा होत्या. पोलीसांनी इमारतीच्या गेटवरच असल्याने त्याची चौकशी केली असता आपटेच असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Protected Content