Home क्राईम धक्कादायक : अकरा वर्षीय चिमुकलीवर तीन महिन्यांपासून अत्याचार; नराधम मौलानाला अटक

धक्कादायक : अकरा वर्षीय चिमुकलीवर तीन महिन्यांपासून अत्याचार; नराधम मौलानाला अटक


बीड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका ११ वर्षीय चिमुकलीवर मौलाना हा तीन महिन्यांपासून अत्याचार करत असल्याचे धक्कादायक घटना समोर आली आहे. पेठ बीड पोलीसांनी नराधमावर अटक केली असून त्याच्यावर पोक्सो कायद्यांर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बीड शहरातील मोमीन पुरा भागात राहणारा रियाज त्याच्या राहत्या घरी उर्दू व अरबी भाषेची शिकवणी घेत होता. यामध्ये प्रत्येकाची वेळ ही वेगवेगळी होती. पत्नी आणि मुले घरी नसताना त्याने हे दुष्कर्म केले असल्याचे आई वडिलांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यामध्ये नैसर्गिक व अनैसर्गिक बलात्कार केल्याचेही म्हटले आहे.प्रकरणांत रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. मुलीने आई-वडिलांकडे तक्रार केल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून आई- वडिलांनी तात्काळ पेट बीड पोलीस ठाणे गाठले असून पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे.


Protected Content

Play sound