जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात असलेल्या पाणी पुरवठा युनिट कार्यालयाच्या आवारात ठेवलेले भंगार साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील गेंदाला मिल परिसरातील आयुक्तांच्या निवासस्थानाच्या मागील बाजूस पाणी पुरवठा विभागाचे युनिट कार्याृृलय आहे. याठिकाणी मोकळी जागा असल्याने मनपाच्या दवाखाना विभागातील भंगार साहित्या याठिकाणी ठेवलेले होते. याठिकाणाहून २१ ऑक्टोंबर ते २२ ऑक्टोंबर रोजी सकाळी १०.३० वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी हे भंगार साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पाणी पुरवठा विभागाचे शाखा अभियंता सुनिल तायडे यांनी बांधकाम शाखा अभियंता संजय दिनकर पाटील यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी तात्काळ याठिकाणी धाव घेत पाहणी केली असता याठिकाणी ठेवलेले साहित्या चोरीस गेल्याचे त्यांना दिसू आले.
चोरट्यांनी मनपाच्या जागेवर ठेवलेले लोखंडी पलंग, खुर्चा, लॉकर टेबल, डीलिव्हरी टेबल, चॅनल गेट, लोखंडी गेट यासह अनेक भंगार साहित्य लंपास केले. याप्रकरणी चोरट्यांनी याठिकाणाहून सुमारे १८ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.