वरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।‘चंद्रयान 3’ मधील ऑप्टिक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून लेंडर कॅमेरा विकसित करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, असे इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. माधवी ठाकरे यांनी महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत मोबाईल द्वारा संवाद साधला.
त्यांना या कॅमेराद्वारे पोझिशन कॅमेरा आणि लॅन्डर हझारड, डिटेक्शन ऍडव्हान्स कॅमेरा तयार करण्याची जबाबदारी होती या महाराष्ट्राच्या कन्या व सध्या अहमदाबाद येथील संस्थेत वरिष्ठ वैज्ञानिक काम करत आहे.
‘चंद्रयान 3’ बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर ती सॉफ्ट लँडिंग केले या घटनेचे औचित्य साधून महात्मा गांधी विद्यालय मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी मोबाईल द्वारा संवाद साधला, यावेळी बोलताना ते म्हणाले की लँडिंग झाल्यानंतर इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांनी सुटकेचा निश्वास सोडला, परंतु हा क्षण त्यांच्यासाठी अतिशय कठीण असल्याचे सांगत भारताने ही मोहीम यशस्वी केल्याने चंद्राविषयीची खूप माहिती आता मिळणार आहे, तर विद्यार्थ्यांसोबत त्यांचे अनुभव कथन केले.
विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठे बघा साध्य करा, आपण जे करतो ते समजून घ्या व त्यामधील सखोल ज्ञान मिळवण्याचे प्रयत्न करा,आपल्यासमोर लक्ष ठेवा लक्ष साध्य होत नाही तोपर्यंत त्याचा मागोवा घ्या तुम्ही विद्यार्थी आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व देशासाठी सेवा करायची ही मनाशी खुणगाठ बांधा असा सल्ला त्यांनी दिला, लवकरच विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी त्या वरणगावात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
या मोहिमेसाठी इसरो संस्थेतील 16500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी अहोरात्र प्रयत्न केले त्यामुळेच हे शक्य झाल्याने महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थी इस्रो वैज्ञानिकांना शुभेच्छा भेटकार्ड पाठवणार आहेत
बुधवारी सायंकाळी चंद्रयान तीन चे यशस्वी लँडिंग झाल्याचे प्रक्षेपण विद्यालयात करण्यात आले त्याचप्रमाणे गुरुवारी सकाळी विद्यार्थ्यांना चंद्रयान एक-दोन व तीन या मोहिमेविषयी माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना चव्हाण होत्या यावेळी पर्यवेक्षक बी एम राठोड विज्ञान शिक्षक सुनील वानखेडे वाय आर पाटील एच एस पाटील महेंद्र भंगाळे लक्ष्मीकांत नेमाडे व शिक्षक उपस्थित होते
यावेळी सुनील वानखेडे यांनी चंद्रयान तीन तयार करण्यासाठी व उड्डाणासाठी लागलेला खर्च यामध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान त्याचप्रमाणे चंद्रावरती उतरलेल्या लँडर व रोव्हर याचे कार्य समजावून सांगून या मोहिमेतून मानवाला होणारा फायदा तसेच भविष्यातील चंद्रावरील सजीव सृष्टी याबाबतची माहिती दिली
मुख्याध्यापिका वंदना इंगळे यांनी बोलताना सांगितले की चंद्रयान 3 ही मोहीम सुवर्ण अक्षरात लिहिली जाणारा क्षण आहे या अथक परिश्रमातून जीपीएस सिस्टीम या ठिकाणी नसताना अनोळखी चंद्रावरील पृष्ठभागावर ती लँडिंग करणे ही कठीण बाब होती मात्र विविध तंत्रज्ञान संस्थांच्या मदतीने कठीण वाटणारे काम सोपे करून दाखवले यामुळे या मोहिमेचा भविष्यात नव्या पिढीला खूप मोठा फायदा होणार आहे याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे
विद्यार्थ्यांची वाढली उत्कंठा
चंद्रयान तीन बाबत इस्रोच्या वैज्ञानिक डॉक्टर माधवी ठाकरे यांच्याकडून माहिती ऐकल्यानंतर विद्यार्थ्यांना अंतराळ व इस्रो याविषयीचे उत्कंठा वाढली यासाठी लवकरच इस्रोची माहिती सांगणारे पोस्टर एक्जीबिशन लावण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रॉकेट मॉडलिंग अँड लॉन्चिंग या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती विद्यालयात देण्यात येणार आहे यामधून त्यांचे इस्रोविषयीचे समज व अंतराळ यावरची माहिती मिळणार आहे