महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी आंदोलन

 

भुसावळ, प्रतिनिधी । येथे महराष्ट्रातील ऑटोरिक्षाधारकांना आर. टी. ओ.द्वारे आकरण्यात येणारे परवाना शुल्क नूतनीकरण शुल्क, प्रवाशी वाहतूक शुल्क वाहन नोंदणी शुल्क इत्यादी शुल्कामध्ये एक वर्षाचे शुल्क माफ करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार काँग्रेसतर्फे आंदोलन करून प्रांताधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.

निवेदनाद्वारे करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे, ऑटोरिक्षा खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाची ई.एम.आय. पुढील ६ महिन्यापर्यंत वसुल करण्यात येऊ नेये. ई.एम.आय.वरील व्याज माफ करण्यात यावे असे आदेश सर्व बँकांना, फायनान्स कंपन्या देण्यात यावे. ऑटोरिक्षा चालक मालकासाठी इतर कल्याणकारी मंडप्रमाणे महामंडळ स्थापन करण्यात यावे. महाराष्ट्र राज्यातील ऑटोरिक्षा चालक व मालक यांना न्याय योजनेअंतर्गत अंतर्भूत करुन ७५००/- रु. प्रतिमाह लागू करण्यासाठी कार्यवाही राज्यशासनाने करावे. ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय बाजरपेठेत कच्च्या तेलाचे भाव ठरविण्यासाठी सरकार नियंत्रण हटविण्यात आल्यावर किमतीमध्ये वाढ होते त्याचप्रमाणे तेलाच्या भावानुसार प्रवाशी वाहतूक भाडे दर निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रमध्ये समिती (केंद्रीय )गठन करावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनांवर जिल्हाध्यक्ष गणेश भैय्या बारसे यांची स्वाक्षरी आहे.

Protected Content