अमळनेरात पाहिल्याच दिवशी शाळा गजबजल्या

अमळनेर प्रतिनिधी । शासनाने दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या असून अमळनेर शहर तसेच ग्रामीण भागातील 5वी ते 7 वी पर्यंतच्या सर्वच शाळा आज गजबजल्याचे चित्र आहे.

एकूणच कोरोनाचा प्रादुर्भावामुळे संपूर्ण राज्यात असल्यामुळे विध्यार्थ्यांच्या हितास्तव शाळा बंद करण्यात आल्या होत्या.साहजिकच विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाईन अभ्यासाचे धडे घ्यावे लागत होते.शासनाने दिलेल्या निर्देशानुसार आज अमळनेर तालुक्यातील व शहरातील शाळांमध्ये घंटानाद होतांना दिसून आला. या आधीच कोरोनाचा प्रभाव कमी असलेल्या ग्रामीण भागात काही महिन्यापूर्वी आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होते.तर याउलट शहरी भागांमध्ये कुठलीही शाळा सुरू न करण्याचा शासनाचे आदेश असल्याने शहरातील शाळामध्ये शुकशुकाट होता. त्यामुळे साहजिकच पक्षांची चिवचिवाट प्रमाणे विद्यार्थ्यांचा किलबिलाट जणू नाहीशी झाली होती. आता मात्र राज्य शासनाने 4 ऑक्टोंबर पासून शहरी व ग्रामीण भागामध्ये पाचवी ते सातवी तसेच आठवी व बारावीचे वर्ग अनुक्रमे सुरू झाले.

अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयात गुलाबपुष्प तसेच चॉकलेट देऊन टाळ्यांचा गजरात विद्यार्थ्यांचे जगीं स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होणार म्हणून आदल्या दिवशीच वर्ग सुरू करताना शालेय व्यवस्थापनाने शासनाने दिलेल्या आदेशानुसार कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून शाळा सुरु केली. यात वर्ग सनेटायझर करणे, मास्क वाटप तसेच विद्यार्थ्यांचे स्कॅनिंग करीत वर्गात प्रवेश देण्यात आला.वेळोवेळी  सोशल डिस्टंसिंगचे पालन केले देखील केले गेले. तब्बल दीड ते दोन वर्षांनी शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांच्या मनावर व चेहऱ्यावर आनंद दिसत आला.

 

Protected Content