जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त जळगावातील गोदावरी फाउंडेशनच्या विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आयोजित या उपक्रमांना विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयात १४ एप्रिल रोजी जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी डॉ. नयना झोपे, प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, समन्वयक प्रा. दीपक झांबरे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि संत गाडगे बाबा यांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला. त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. नकुल गाडगे यांनी बौद्ध वंदना सादर केली. आयोजित वक्तृत्व स्पर्धेत समीक्षा तायडे यांनी प्रथम तर शेख अल्तमश यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. प्रमुख पाहुण्या डॉ. नयना झोपे यांनी भारतीय राज्यघटनेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काजल पाटील व डिंपल पाटील यांनी केले.

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्येही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. पंकज शर्मा यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी डॉ. विपुल, डॉ. वसिक, डॉ. स्नेहा, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. भूषण, डॉ. गणेश महाजन, डॉ. समता तसेच रजिस्ट्रार डॉ. ललित महाजन यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी येथेही १४ एप्रिल २०२६ रोजी जयंती साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यांनी आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील योगदानावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी बुद्ध वंदना सादर करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे प्राचार्य विशाखा गणवीर यांच्या उपस्थितीत जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या महान कार्याला आदरांजली वाहण्यात आली. समता, शिक्षण व सामाजिक न्याय या विचारांनी प्रेरित होऊन सर्वांनी त्यांच्या मार्गावर चालण्याचा संकल्प व्यक्त केला.
डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथेही जयंती उत्साहात साजरी झाली. प्राध्यापिका अमिता निकम यांनी डॉ. आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक व संविधान निर्मितीतील योगदानावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एप्लीकेशनमध्ये प्राचार्य डॉ. निलीमा वारके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आंबेडकरांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. मानसी अहिरे यांनी केले.
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात संचालक डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वंदना व अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. प्रज्ञा बाविस्कर यांनी केले.



