पुणे- दिवाळीपूर्वी राज्यातील शाळा सुरू होणार नाहीत. तसेच दिवाळीनंतरही कोरोनाचा अंदाज घेऊनच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे स्पष्ट केले.
राज्य शासन व पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने आयोजित ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. पवार म्हणाले, देशातील काही राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. पण शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढू लागले. हे लक्षात आल्यानंतर तेथील शाळा बंद करण्यात आल्या. त्यामुळे राज्यात दिवाळीपूर्वी शाळा सुरू होणार नाहीत. दिवाळीनंतरही अंदाज घेतल्यानंतरच शाळा सुरू केल्या जातील.
गील सात महिन्यांपासून आपण कोणताही सण साजरा करू शकलो नाही. येणारे नवरात्रही साधेपणाने करू. विनाकारण गर्दी करू नये, असा आवाहनही पवार यांनी केले.