यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील यावल नगरपरिषदव्दारे संचलित, साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नुकतेच शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
यावल येथील साने गुरूजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक एम. के. पाटील आणि परिक्षा केंद्र प्रमुख व्ही. टी. नन्नवरे सर्व शिक्षकांची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ब्लॉक मध्ये पार पडली असुन, विद्यालयाच्या क्रमांक ३३ १३ ०६ अशी बैठक व्यवस्था परीक्षा करण्यात आली होती.
विद्यार्थ्यांसाठीची संपुर्ण परीक्षा व्यवसस्था पुढीलप्रमाणे करण्यात आली होती ब्लॉक नंबर एक ते आठ एक ब्लॉक मध्ये एकुण २४ विद्यार्थी होते तर एम आय ३३१३०६ ०० १ ते एम एस ३३ १३ ०६ १७० असे एकूण १७० विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेतला, संपुर्ण शिष्यवृत्ती परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा ३१ जुलै २०२२ चे केंद्र प्रमुख व्ही.टी. नन्नवरे यांनी प्रसिद्धीव्दारे कळविले आहे.