जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलिस दलात पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस नाईक राष्ट्रीय खेळाडू विनोद पितांबर अहिरे यांनी 40 किलोमीटर स्केटिंग करून देशातील पहिलेच पोलिस ठरलेय. त्याच्या या उपक्रमामुळे जळगाव पोलिस दलाचे नाव ऊचावलेय.
जळगाव पोलीस दलात सन 2003 मध्ये रुजू झालेले विनोद अहिरे यांना लहानपणापासूनच स्केटिगची आवड होती. त्यासोबतच पोलीस दलात मिळालेल्या संधीमुळे स्पोर्टमध्ये करिअर करण्याची त्यांची इच्छा असताना पोलिस दलातील अधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन देत जळगाव पोलीस दलासाठी स्केटिंग खेळण्यासाठी विविध राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते. सन 2015 मध्ये येथे झालेल्या राष्ट्रीय आईस हॅकि स्पर्धेमध्ये विनोद अहिरे यांनी महाराष्ट्र टीमचे नेतृत्व केले होते. यामुळे ते अख्या महाराष्ट्रातुन महाराष्ट्र पोलीस दलातील एकमेव आईस हॉकीपटू ठरले आहेत.तर जळगाव स्पोर्ट्स कोट्यात तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रवीण साळुंखे यांनी भरती केले .अहिरे यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. त्यांना लहानपणा पासूनच स्केटिंग ची आवड होती. त्यामुळे एकदा ते एका स्केटिंग प्रशिक्षण वर्गात स्केटिंग प्रशिक्षणा बद्दल चौकशी करण्यासाठी गेले असता तेव्हा प्रशिक्षक नसल्याने तेथे उपस्थित खेळाडूंच्या पालकांना त्यांनी विचारपूस केली असता त्यांचा अवतार पाहून ते त्यांना म्हणाले की तुझे वडील काय काम करतात आणि त्यांना पगार किती आहे त्यावर अहिरे यांनी सांगितले की बाराशे रुपये त्यावर ते पालक म्हणाले की बेटा स्केटिंग सेट हजार रुपयांपर्यंत येतो मग तुम्ही खाणार काय यामुळे विनोद अहिरे यांना रडू कोसळले. पण त्यांच्या मनात स्केटिंग शिकण्याची प्रचंड जिद्द होती. म्हणून त्यांनी वडिलांकडून कसेबसे 60 रुपये मिळवले आणि भंगार बाजारातून जुने स्केट खरेदी केले आणि स्वतः घराकडील रोडवर स्केटिंग शिकले आणि त्याचबरोबर कराटेचे प्रशिक्षण त्यांनी घेतले 2002 मध्ये जळगाव जिल्हा पोलिस दलात हजार रुपये मानधनावर पोलिसांना कराटे शिकवण्यासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक कुलवंतकुमार यांनी त्यांना लावले. नंतर प्रवीण साळुंखे यांनी 2003 मध्ये पोलीस स्पोर्ट्स कोट्यात भरती केले .नागपूर येथील ट्रेनिंग पूर्ण करून ते पोलीस बॉईज यांना प्रशिक्षण देणे कामी त्यांना नियुक्त करण्यात आले. कराटे, स्केटिंग च्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत वीस हजार प्रशिक्षित विद्यार्थी तयार केले आहे .त्यापैकी अनेक खेळाडूंनी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके प्राप्त केली आहे. तसेच त्यांना पोलीस अधीक्षक पंजाबराव ऊगले,एसपी. जयकुमार, एसपी डॉक्टर जालींदर सुपेकर, एसपी दत्तात्रय कराळे यांचे मार्गदर्शन लाभले आहे विनोद अहिरे यांनी 2015 मध्ये येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते तसेच त्यांना आदर्श पोलिस पुरस्कार ,उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार समाज शिक्षक शिक्षक पुरस्कार, युवा प्रेरणा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
यातच पुन्हा देशासाठी विक्रम करावा यानिमित्ताने नुकताच जळगाव येथील बहिणाबाई गार्डन मधील पाचशे मीटर सिमेंट वॉकिंग ट्रॅक 80 राऊन्ड एवजि 91 राऊन्ड ग्राउंड वर सलग स्केटिंग करून विक्रम मोडीत काढला आहे. यातच 40 व्या वर्षात 40 किलोमीटर स्केटिंग करणारे हे भारतातील पहिले पोलीस विनोद अहिरे ठरले आहेत.