मुंबई (वृत्तसंस्था) अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या कामात घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केला आहे. विशेष म्हणजे शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केले.
शिवस्मारकाच्या कामातील अनियमितता आणि गैरव्यवहाराबाबत कॅगच्या अधिकाऱ्यांनी तक्रार केल्याचा आरोप काँग्रेसचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन केला आहे. अनियमितेची चौकशी व्हावी यासाठी केंद्रीय दक्षता आयोगाला पत्र लिहणार असून अनियमितेत केवळ अधिकारी सहभागी नाहीत तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्र्यांचा सहभाग आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीने केला आहे.
शिवस्मारकातील गैरव्यवहाराबाबत विभागीय लेखापालांनी लिहलेले पत्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उघड केले. प्रकल्पाची एक वीटही न रचता 80 कोटी रुपये खर्च केले गेले. हे पैसे देण्यासाठी आपल्यावर दबाव आणल्याचा अधिकाऱ्यांचा लेखी पत्रात दावा आहे. सरकारने शिवस्मारकाची 121.2 मीटर उंची कायम ठेवताना पुतळ्याची उंची कमी केली आणि तलवारीची उंची वाढवली. स्मारकाची जागाही कमी करण्यात आली, असे नवाब मलिक आणि सचिन सावंतांनी सांगितले.