“गुरूजी माझ्या गाडीवर बसा” असे सांगून ठगाने लांबविले ९८ हजाराची रोकड

फैजपूर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘गुरुजी मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही माझ्यासोबत गाडीवर बसा मी तुम्हाला घरी सोडतो असे बोलून अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त शिक्षकाजवळीला ९८ हजारांची रोकड घेऊन पसार झाल्याची धक्कादायक घटना फैजपूर शहरातील दक्षिण पेठ येथे  घडली. यासंदर्भात फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

फैजपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्‍मण गणपत नेमाडे (वय-७६) रा. आराधना कॉलनी, फैजपूर, ता. यावल हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. २३ फेब्रुवारी रोजी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान ते गावातील पोस्ट ऑफिसमध्ये पेन्शन घेण्यासाठी एक ते गेले होते. ते पोस्टातून ९८ हजार रुपयांची रोकड काढून ते घरी पायी जात असताना विना नंबरच्या मोटरसायकलवर अज्ञात व्यक्तिने तोंडावर रुमाल बांधला होता. तो म्हणाला की, “गुरुजी मी तुम्हाला ओळखतो, माझ्या दुचाकीवर बसा, मी तुम्हाला घरी सोडून देतो” असे सांगून त्यांच्या जवळील ९८ हजार रुपयांची रोकड घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात लक्ष्मण नेमाडे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ६.३० वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख करीत आहे.

Protected Content