आजपासून सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरण शिबीर

यावल  प्रतिनिधी  ।  तालुक्यातील सावखेडा सिम   प्राथमिक  आरोग्य अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कोळवद आणि दहीगाव या ठिकाणी आज लसीकरण सुरू करण्यात आले असून परिसरातील नोंदणी झालेल्या नागरिकांनी या लसीकरण शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य यंत्रणेतर्फे करण्यात आले आहे 

 

या संदर्भात सावखेडा सीम  तालुका यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राकडून  देण्यात आलेल्या माहीतीनुसार आज दि. १४ जुन रोजी सावखेडा सिम  या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या दहिगाव आणि  प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कोळवद या गावातील नागरीकांसाठी लसीकरण शिबीर सुरू राहणार आहे.  या शिबिरात ४५ वर्षावरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात येणार आहे.  ज्या नागरिकांनी कोवीशील्ड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे त्यांनी ८४ दिवसानंतरच ( १२ ते १६ आठवडे दरम्यान ) दुसरा डोस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर यावे.  लसीकरणाला येताना नागरीकांनी जेवण किवां नाश्ता करूनच यावे व येतांना सोबत  आपले आधार कार्ड आणि झेरॉक्स आणावे असे आवाहन सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे  वेद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व  डॉ. नसिमा तडवी यांनी केले आहे.

Protected Content