धरणगावात बंद घर फोडून रोकडसह दागीने लांबविले

धरणगाव प्रतिनिधी ।  शहरातील दादाजी नगर परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, गोपाल भगवान महाजन (वय-24 रा. दादाजी नगर धरणगाव) हे कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते.  13 जून रोजीच्या मध्यरात्री २ ते सकाळी ५ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजाचा कुलूप तोडून आत प्रवेश करत लाकडी कपाटातील ८० हजार रुपये रोकड आणि लोखंडी पेटीचे कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. दुसऱ्या घटनेतील त्याच गल्लीतील नवनीत अरविंद पवार रा.मराठे गल्ली यांच्या घराचे दरवाजा तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह मुद्देमाल असा एकूण १ लाख १० हजार चाळीस रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार योगेश जोशी करीत आहे.

Protected Content