यावल येथे विद्यार्थी वाचवा संघटनेतर्फे निवेदन

यावल प्रतिनिधी । येथील विद्यार्थी वाचवा संघटनेतर्फे प्रशासनाला निवेदन देऊन विविध शैक्षणिक समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली

येथील विद्यार्थी वाचवा संघटनेतर्फे आज प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, सध्या कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत आहे. सर्व व्यवसाय व व्यवस्था ठप्प असल्याने राज्य सरकार आर्थिक अडचणीत आहे. तरी शासनाने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आपण परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना पुढील वर्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी बांधवांची अपेक्षा आहे.

सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत . अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक भविषयाची चिंता भासवत आहे . त्याच बरोबर एटीकेटी, बॅकलॉग्ज आदींबाबत टांगती तलवार आम्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यावर लटकत आहे. या सर्व घडामोडी घडत असताना विद्यार्थ्यांची ढासळणारी मानसिकता सुद्धा लक्षात घेऊन आपण निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे.

जर परीक्षा रद्द झाल्या नाहीत आणि परीक्षा दरम्यान विद्यार्थ्यांना कोविड- १९ ची लागण झाल्यास त्याला जबाबदार कोण ?
२) कोविड- १९ सारख्या परिस्थितीत परिक्षा रद्द करणार नसाल तर १० लाख विद्यार्थ्यांना नोकरी देण्याची लेखी हमी जाहीर केली आहे का ?
३) ऑनलाईन स्टडी व एक्झाम हे अयशस्वी आहे कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना नेटवर्क समस्या , मोबाइल अभावी आर्थिक परिस्थिती खालवल्याने नेटपॅक उपलब्ध नसणे अश्या असंख्य समस्या आहेत म्हणून परीक्षा रद्द झाली पाहिजे .
४) आपण सामान्य नागरिक म्हणून आणि तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून सदविवेक बुद्धीने वरील प्रमाणे परीक्षा रद्द करावी असे निवेदन तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना तहसील कार्यालयात देण्यात आले.

या निवेदनावर संघटनेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत. त्यात हर्षल गाजरे ( यावल तालुका अध्यक्ष )स्नेहल फिरके ( यावल तालुका उपअध्यक्ष ); अक्षय परतणे ( सरचिटणीस ); संजीदा बडगुजर ( यावल तालुका सचिव ) हेमंत भंगाळे ( कार्याध्यक्ष ); निखिल जावळे ( कोषाध्यक्ष); मयूर सोनवणे संघटक यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Protected Content