भर दिवसा लांबविली एक लाखाची रक्कम !

सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भर दिवसा शहरातून एका शेतकर्‍याकडे असणारी एक लाख रूपयांची रक्कम लांबवून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील गौरखेडा येथील रमेश यादव महाजन हे सावदा शहरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर उभे होते. याप्रसंगी त्यांच्याकडे असणार्‍या बॅगमध्ये एक लाखाची रक्कम व काही महत्त्वाची कागदपत्रे होती. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी महाजन यांना तुमच्या मागे पैसे पडले आहे, असे सांगितले. यामुळे महाजन यांचे लक्ष विचलित होताच दोघांनी त्यांच्या हातातील पैसे असलेली पिशवी हिसकावून पलायन केले. ही घटना काही क्षणातच घडल्याने महाजन यांनी आरडा-ओरडा केला तोवर चोरटे पळून गेले होते.

याप्रकरणी सावदा पोलीस स्थानकात दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक डी.डी.इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान गायकवाड व त्यांचे सहकारी करत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: