सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील उदळी येथे गौण खनिजाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल खात्याच्या पथकाने जप्त केले आहे.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील उदळी येथे एमए-१९ एएन ४६५४ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमधून अवैध गौणखनिजाची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. यानुसार बी. एम. पवार मंडळ अधिकारी सावदा; एस. के. पाटील तलाठी सावदा; एम. एच तडवी तलाठी थोरगव्हाण; श्रीहरी कांबळे तलाठी रायपूर; ओ. एस. मटाले तलाठी मस्कावद; मोमीन तलाठी उदळी; चोपडे तलाठी गाते यांनी आज हे वाहन जप्त केले.
संबंधीत ट्रॅक्टर हे संजय भास्कर धनगर (रा. चांगदेव ता. मुक्ताईनगर) यांच्या मालकीचे असून त्याचा पंचनामा करून सावदा पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले आहे. ही कारवाई प्रांताधिकारी कैलास कडलग व तहसीलदार बहुगणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.