सावदा, ता. रावेर, जितेंद्र कुलकर्णी । माजी मंत्री तथा माजी खासदार एकनाथराव गायकवाड हे खर्या अर्थाने शोषितांचे कैवारी असल्याची श्रध्दांजली आमदार शिरीषदादा चौधरी यांनी अर्पण केली आहे.
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार व मंत्री तसेच दलीत चळवळीतील मोठे व्यक्तीमत्व असणारे एकनाथराव गायकवाड यांचे दिनांक २८ एप्रिल रोजी सकाळी उपचार सुरू असतांना निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीषदादा चौधरी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
या संदर्भात आ. चौधरी म्हणाले की, एकनाथराव गायकवाड हे दलीत चळवळीतील मोठे व्यक्तीमत्व होते. तसेच समाजातील दिन-दलीतांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती, असे नमूद करत आ. शिरीष चौधरी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.