आ. चिमणराव पाटील यांना कोरोनाची बाधा

पारोळा प्रतिनिधी । आमदार चिमणराव पाटील यांना कोरोनाची बाधा झाली असून त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

एरंडोल विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार चिमणराव पाटील यांचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे त्यांनी होम आयसोलेशन मध्येच तज्ज्ञांकडून उपचार सुरू केले आहेत. दरम्यान, आमदार पाटील यांनी आपल्या संपर्कात आलेले अधिकारी आणि नागरिकांनी कोरोनाची चाचणी करून घेत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. आपली प्रकृती एकदम चांगली असून कुणीही काळजी करण्याचे कारण नसल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी नमूद केले आहे.

Protected Content