सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील माजी नगरसेविका सौ. मीनाक्षी कोल्हे यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सावदा येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेविका तथा सावदा येथील प्रतिथयश इंजिनियर राजेश कोल्हे यांच्या पत्नी सौ मीनाक्षी राजेश कोल्हे यांचे आज सकाळी साडेसात वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक १४ रोजी दुपारी तीन वाजता त्यांच्या प्लॉट एरिया घरापासून निघणार आहे.
सौ. मीनाक्षी कोल्हे यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून समाजाच्या सर्व स्तरांमधून संवेदना व्यक्त करण्यात येत आहे.