सावदा, ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची पारोळा नगरपालिकेत बदली करण्यात आली असून या संदर्भातील आदेश नगरविकास खात्याने जारी केले आहेत.
येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांची पारोळा येथे बदली करण्यात आली असून नगरविकास खात्यातर्फे शासनाचे अवर सचिव अ.का. लक्कस यांनी या संदर्भातील निर्देश जारी केले आहेत. यानुसार त्यांनी काल अर्थात दिनांक १७ रोजी बदली करण्यात आली असून ते आज म्हणजेच १८ ऑक्टोबर रोजी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळणार आहेत.
किशोर चव्हाण यांच्या जागेवर सावदा येथील मुख्याधिकारीपदी अद्याप कुणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. तर सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांसाठी दुसर्या नगरपालिकेतील मुख्याधीकार्यांकडे येथील सूत्रे देण्यात येतील, नंतर काही दिवसात येथे नवीन मुख्याधिकारी मिळतील असे समजते.
किशोर चव्हाण यांनी अल्प काळात आपल्या कामाची छाप पाडली होती. त्यांनी विविध कामांना गती दिली होती. विशेष करून विद्यमान नगरपालिकेतील पदाधिकार्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी प्रशासक म्हणून केलेली कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे.