सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । आज देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केल्यानंतर येथील भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करून आपला आनंद व्यक्त केला.
आज सकाळीच देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे वृत्त येताच येथे भाजपतर्फे जोरदार जल्लोष करण्यात आला. याप्रसंगी नरसेवक राजेंद्र चौधरी, विनोद नेमाडे,अक्षय सरोदे,सागर चौधरी,नोमदास भंगाळे,नितीन भिरूड,महेंद्र नेमाडे,साहील भंगाळे ,सर्वेश लोमटे,भरत चव्हाण,गौरव चौधरी,सोपान राणे,नाजीम भाई,दिलीप येवले,अँड.धनंजय चौधरी,विजय पाटील,रेवा पाटील,गौरव भंगाळे,सरोदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.