Home Agri Trends आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीकविमा भरपाई...

आ.चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याने सावदा मंडळातील केळी उत्पादकांना ११.०७ कोटींची पीकविमा भरपाई !


मुक्ताईनगर– लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला असून एकूण ११.०७ कोटी रुपयांच्या पीकविमा भरपाईचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०२४-२५ च्या आंबिया बहार फळपीक विमा योजनेअंतर्गत १,६२२ शेतकऱ्यांना ही नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. अनेक महिन्यांपासून रक्कम प्रलंबित राहिल्याने शेतकरी चिंतेत होते; मात्र हा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे.

नियमांनुसार विम्याची रक्कम १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत जमा होणे अपेक्षित होते. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा न झाल्याचे प्रकरण १३ डिसेंबर २०२५ रोजी पुढे आले. हा विलंब लक्षात येताच सावदा, उदळी, तांदलवाडी परिसरात चिंता निर्माण झाली होती. या गंभीर परिस्थितीची तात्काळ नोंद घेऊन आमदार चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली व प्रकरण शासन दरबारी पोहोचवले.

यानंतर मंत्री गिरीश महाजन व आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन सावदा मंडळातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा सविस्तर मांडली. शेतकऱ्यांनी भोगलेल्या विलंबाबद्दल, त्यांची आर्थिक अडचण, तसेच तातडीने विमा भरपाई मिळण्याची गरज याबाबत त्यांनी ठोस निवेदन सादर केले.

या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले. विधानसभेत कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाहीर केले की, भारतीय कृषी विमा कंपनीकडून (AIC) आवश्यक निधीचा प्रस्ताव नोव्हेंबर २०२५ अखेरीस प्राप्त झाला असून, राज्य शासनाकडून रक्कम वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नुकसानभरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे


Protected Content

Play sound