बोढरे येथे सरपंचानी केली सॅनिटायझरची फवारणी !

चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुक्यातील बोढरे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये या पार्श्वभूमीवर खुद्द सरपंचाने टॅंकरच्या साहाय्याने सॅनिटायझरची फवारणी करून माणुसकीचा संदेश दिला.                     

चाळीसगाव शहरासह तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दुसर्या लाटेने थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यात ग्रामीण विभागात कोरोना बांधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पाश्र्वभूमीवर बोढरे गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून सरपंच गुलाब राठोड याने खुद्द सॅनेटाईझरची फवारणी टॅंकरच्या साहाय्याने केली. त्यामुळे याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी गावातील प्रत्येक गल्लीत सॅनेटाईझ करण्यात आले. फवारणी प्रसंगी बोढरे ग्रामपंचायतीचे सरपंच गुलाब राठोड, उपसरपंच अर्जून राठोड, सदस्य रोहीदास जाधव, सदस्य एकनाथ बर्वे, सदस्य प्रेम चव्हाण, ग्रामपंचायत कर्मचारी महेश चव्हाण, निवृत्ती राठोड व वसंत चव्हाण आदी उपस्थित होते. तसेच गावात विना मास्क धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे सुतोवाच सरपंच यांनी केले.

Protected Content