यावल प्रतिनिधी । ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर झालेल्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आजपासून सरपंचांच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तर उद्या दि.१३ फेब्रुवारी रोजी मारुळ येथील सरपंच / उपसरपंचपदाची निवड होणार आहे.
गावनिहाय सरपंच व उपसरपंच झालेली निवड पुढील प्रमाणे विरावली कमीला फिरोज तडवी विजयी यांना ५ मते मिळाली असून त्यांच्या प्रतीस्पर्धी हमीदा टेनु तडवी यांना ४ मते मिळाली आहेत. उपसरपंचपदासाठी मनिषा पाटील हया विजयी झाल्या आहेत. डोंगरकठोरा येथील नवाज बिसमील्ला तडवी विजयी यांनी ७ तर जुम्मा रशीद तडवी यांना ६ मते मीळाली आहेत तर उपसरंचपदी धनराज पाटील यांची निवड करण्यात आलीआहे.
मोहराळे येथे सरपंचपदी नंदा गोपाळ महाजन तर उपसरपंचपदी जहागीर तडवी यांची निवड करण्यात आली असुन ,शिरसाड या गावाच्या सरपंचपदी दिपक वामन इंगळे तर उपसरपंचपदी राजेंद्र सोनवणे , दहीगाव सरपंचपदी अजय बाळु अडकमोल तर उपसरपंचपदी किशोर महाजन, अट्रावल सरपंचपदी मोहन भिमराव कोळी तर उपसरपंचपदी संगीता नितीन चौधरी, आामोदे -सरपंचपदी हसीन फकीरा तडवी तर उपसरपंच म्हणुन पोर्णीमा भंगाळे , कोळवद- सरपंच पदी याकुब विनायक तडवी तर उपसरपंच शशीकांत चौधरी, हिंगोणे सरपंचपदी रुकसाना फिरोज तडवी तर उपरपंच भैरवी पाटील, बामनोद सरपंचपदी गीरीष विलास तायडे तर उपसरपंच पदी तुषार दिलीप जावळे, किनगाव बुद्रुक – सरपंचपदी निर्मला संजय पाटील तर उपसरपंचपदी लुकमान कलंदर तडवी यांची निवड झाली आहे.