धरणगाव प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे व सारजाई कुडे विद्यालयाची सालाबादप्रमाणे यंदाही या वर्षाची इ ८ वीच्या वर्गाची शैक्षणिक सहल काढण्यात आली असून मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
अहमदाबाद येथील साबरमती आश्रम, साबरमती रिव्हर फ्रंट, नव-नवीन तंत्रज्ञान असलेली सायन्स सिटी, अक्षरधाम मंदिर, अडलाज वाव, भद्रकाली मंदिर आणि दगडाची जग प्रसिध्द जाळी, कांकरिया सरोवर, पुष्कर येथील उंट सफारी, जयपूर, (गुलाबी शहर) येथील ऐतिहासिक स्थळे, जंतरमंतर, सिटी पॅलेस, जल महल, अमेर किल्ला, हवा महल, कनक गार्डन, तसेच अन्य प्रेक्षणीय ठिकाणी नेण्यात आली होती.
सहलीत विद्यार्थ्यांनी थरच्या वाळवंटाचा, ऐतिहासिक व सांस्कृतिक संगीताचा तसेच अन्य स्थळ पाहून सहलीचा मनसोक्त आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी अशी स्थळ आवर्जून पहावीत म्हणून संस्थेचे अध्यक्ष हेमलालशेठ भाटिया, संस्थेचे सचिव प्रा.रमेश महाजन यांनी मार्गदर्शन केले. तसेच सर्व संचालक मंडळ व दोघंही मुख्याध्यापक तसेच शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्यात.
सहलीसोबत माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस.एस.पाटील, सहल प्रमुख ए.एच.पाटील, आर.जी.देवरे, व्ही.एल.मोरे, योगेश चिंचोरे, किरण पाटील, सरोज तारे, जे.एस.बोरसे यांनी सहल यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.