पिस्तूल जिवंत कडतुस आणि धारदार हत्यार हस्तगत
चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरात रेकॉडवरील गुन्हेगारांची तपासणी करत असतांना चाळीसगाव शहर पोलीसांनी शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पुण्यातील कोयता गँगचा सदस्यासह चाळीसगावातील दोन जण असे एकुण ३ जणांना श्रीकृष्ण नगरातून अटक करण्यात यश आले आहे. तिघांकडून गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस आणि चॉपर जप्त केले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शुक्रवारी २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता श्रीकृष्ण नगरात तपासणी करण्यात आली. यात ऋषीकेश उर्फ मायकल व त्याचे वडील दिपक भटू पाटील रा. श्रीकृष्ण नगर, करगाव यांच्या घरात हत्यारे असल्याचे तपासणी केली असता घरातून गावठी पिस्तूल, १ जिवंत काडतूस आणि चॉपर मिळून आला. ही हत्यारे त्यांनी निखील उर्फ बंडी निक्या जगन्नाथ शिंदे रा. लक्ष्मी नगर, येरवडा, पुणे व त्यांच्या मित्रांकडून घेतली असल्याचे समोर आले. दरम्यार निखील उर्फ बंडी निक्या हा चाळीगाव शहरात राहत होता. त्याला देखील पोलीसांनी अटक केली आहे. निखील शिंदे हा पुण्यातील सराईत गुन्हेगार असून कोयता गँगचा सदस्य आहे. त्याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई जिल्हा पेालीस अधिक्षक मेहश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधिक्षक अभयसिंह देखमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउनि योगेश माळी, पो.ना. दिपक पाटील, पो.कॉ. अमोल भोसले, पो.कॉ विनोद खैरनार, योगेश बेलदार, विनोद भोई, नितीश पाटील, निलेश पाटील, नंदकिशोर महाजन, मनोज चव्हाण, मपोहेकॉ विमल सानप यांनी केली.