चाळीसगाव येथे शहीद सन्मान स्मृती विशेषांक 2020 चे प्रकाशन व लोकार्पण

 

चाळीसगाव, प्रतिनिधी । भगतसिंह, राजगुरू व सुखदेव या स्वातंत्रासाठी प्राणार्पण केलेल्या स्वातंत्रवीरांच्या जिवन चरित्राची माहिती देणारा त्यासोबतच पंडित रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान व खानदेश रत्न उत्तमराव पाटील व लीलाताई पाटील यांच्या जिवन कार्याविषयी सविस्तर माहिती देणारा शहीद सन्मान स्मृती विशेषांक 2020 चे प्रकाशन व लोकार्पण आज मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी करण्यात आला.

भगतसिंह जयंतीचे औचित्य साधून शहीद सन्मान स्मृती विशेषांक 2020 चे प्रकाशन खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण,जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक प्रमोद बापू पाटील, जिल्हा परिषद सदस्य भूषण पाटील यांच्या करण्यात आले. विशेषांकासाठी .कैलासबापू सूर्यवंशी, उमेश (पप्पूदादा) गुंजाळ, घृष्णेश्वर पाटील, विजया पवार, लक्ष्मणबापू शिरसाठ, अरुण पाटील, राजेंद्र पगार, हर्षल चौधरी, विलास पाटील आदींचे सहकार्य लाभले. दरम्यान,शहीद सन्मान स्मृती विशेषांक 2020 च्या प्रकाशन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी हा अंक चाळीसगाव तालुक्यातील प्रत्येक शाळेपर्यंत, प्रत्येक ग्रंथालयापर्यंत पोहोचण्याचा संकल्प अंकाचे संपादक पंकज रणदिवे व जयश्री रणदिवे यांनी व्यक्त केला.

Protected Content