पहूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहूर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील चिंचोले यांची महाराष्ट्र एनजीओ समितीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. निती आयोग, भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. युवराज येडुरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. सुनीता मोडक यांच्या स्वाक्षरीने अधिकृत नियुक्ती पत्र जारी करण्यात आले असून, या निवडीने जळगाव जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संतोष पाटील यांनी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामीण भागात सामाजिक न्याय, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत समितीने त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण जिल्ह्यातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

या निवडीच्या निमित्ताने जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, भाजपा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका अध्यक्ष पद्माकर पाटील, तसेच अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. जे. के. चव्हाण, संजय गरुड, अब्बु तडवी (सरपंच, पहूर पेठ), संजय देशमुख (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती), प्रदीप लोढा (माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद जळगाव), राजधर पांढरे (माजी जिल्हा परिषद सदस्य), शाम सावळे, अरुण घोलप (संचालक, शेंदुर्णी जिनिंग), राकेश लोढा (चेअरमन, पहूर पेठ विकास सोसायटी), साहेबराव देशमुख, गोकुळ कुमावत (माजी चेअरमन), तसेच इतर ग्रामपंचायत सदस्य आणि स्थानिक सामाजिक संस्थांनीही या निवडीचे स्वागत केले आहे.
संथ आणि सातत्यपूर्ण सामाजिक कार्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याच्या पाटील यांच्या प्रयत्नांना या निवडीमुळे अधिक बळ मिळेल, अशी भावना जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. जळगाव जिल्ह्यातील सामाजिक चळवळींना नवी दिशा मिळेल आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असा विश्वास सर्वत्र व्यक्त केला जात आहे.



