Home Cities भुसावळ  शैलजा नारखेडे यांचा पदभार अधिकृत नसल्याचा संतोष चौधरी यांचा दावा

 शैलजा नारखेडे यांचा पदभार अधिकृत नसल्याचा संतोष चौधरी यांचा दावा


भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । भाजपाच्या उपनगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांनी प्रभारी नगराध्यक्ष पदाचा चार्ज घेतल्याचा दावा अधिकृत नसल्याचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

“कोणीही लेखी आदेश दिलेला नाही. गालाला गुलाल लावून फिरत आहेत, फिरू द्या; हा नगरपालिका प्रशासनाचा मजाक आहे,” अशी टीका त्यांनी केली. नगराध्यक्ष पदाचा पदभार हा विद्यमान नगराध्यक्षांकडूनच दिला जातो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकाऱ्यांकडून नगराध्यक्षांना देण्यात आलेले पत्र अद्याप प्राप्त झाले नसल्याचा दावा करत, कोर्टाच्या अंतिम निर्णयापर्यंत कोणालाही चार्ज देता येणार नसल्याचे चौधरी म्हणाले. तसेच, पदभार देण्यासाठी शासकीय अधिकाऱ्याची उपस्थिती आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सात नगरसेवकांविरोधात डिस्क्वालिफाय करण्यासाठी पत्र दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.

न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत कुणीही नगराध्यक्ष पदभार स्वीकारणे हे बेकादेशीर माजी आमदार संतोष चौधरी यांचे प्रतिपादन भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष म्हणून प्रभारी उपनगराध्यक्ष सौ. शैलजा नारखेडे यांनी पदभार स्वीकारला असे भाजपाने जाहीर केले परंतु माजी आमदार संतोष चौधरी यांनी या पदभारावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, ज्या सात नगरसेवकांनी पदभार द्यावा अशी मागणी केली ते सर्वच्या सर्व नगरसेवक नव्हते, त्यांच्या सौभाग्यवती या नगरसेविका होत्या त्यामुळे या सातही लोकांना अपात्रता करावी असा अर्ज पुष्पा कैलास चौधरी यांनी दिलेला आहे. तर ज्यांनी पदभार घेतलेला आहे त्यांनी हा पदभार कोणाकडून व कसा व कोणत्या नियमाने घेतला आहे ? हे सांगावे जिल्हाधिकाऱ्यांचे असे कुठलेही आदेश अद्याप तरी प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे सर्वकाही बेकायदेशीर सुरू आहे. या सर्व विषयावर सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असणार आहे. त्यामुळे आज कितीही फटाके फोडले व आनंदोत्सव साजरा केला तरी त्याला कायद्याचा कुठलाही आधार नाही, असे माजी आमदार व भुसावळ नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक संतोष चौधरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. एकूणच भुसावळच्या नगरपरिषदेचा नगराध्यक्ष पदाचा पदभार घेणे हे वादातीत आहे. न्यायालयीन बाब आहे. त्यामुळे भुसावळकर व एकूणच पालिका प्रशासन देखील संभ्रमात आहे.


Protected Content

Play sound