Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज जयंती साजरी

मुक्ताईनगर येथे संत तुकाराम महाराज जयंती साजरी

0
72

मुक्ताईनगर प्रतिनिधी । येथे जगदगुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

संत तुकाराम महाराज जयंतीनिमित्त शहरातील प्रवर्तन चौकात तुकोबारायांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी रवींद्र हरणे महाराज, पंचायत समिती सभापती शुभांगी भोलाने, नगराध्यक्षा नजमा तडवी, उपनगराध्यक्षा मनीषा पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, छोटू भोई, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष संदीप देशमुख, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील, नगरसेवक संतोष मराठे, नीलेश शिरसाठ, संतोष कोळी, मुकेश वानखेडे, नगरसेविका कुंदा पाटील, दुर्गा मराठे, तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख, उपाध्यक्ष माणिकराव पाटील, दिनेश कदम, धनंजय सापधरे, डॉ.जगदीश पाटील, विकास पाटील, छबिलदास पाटील आदी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound