राजधानी दिल्लीत भूकंपाचे धक्के

नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजधानी दिल्लीला आज सायंकाळी भूकंपाचा धक्का बसल्याचे वृत्त असून याचा केंद्रबिंदू हिंदकुश पर्वतराजीत असल्याची माहिती समोर आली आहे.

पालघरमध्ये कालपासून भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्यामुळे नागरिक भयभीत झालेले आहेत. यातच आज सायंकाळी राजधानी दिल्ली येथे भूकंपाचा धक्का बसला. याची रिश्टर स्केलवरील तीव्रता ५.८ इतकी असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. तर या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगाणिस्तानमधील हिंदकुश पर्वतराजीमध्ये असल्याची माहितीसुध्दा देण्यात आली. यात कोणत्याही प्रकारची जीवीत वा वित्त हानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, एनसीआर परिसरात याची तीव्रता थोडी जास्त जाणवल्याचे वृत्त आहे.

तर दुसरीकडे पालघर परिसरात आज पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवल्याने भितीचे वातावरण निर्मित झाले आहे. एनडीआरएफने येथे पथक पाठविले आहेत. एनडीआरएफने डहाणूनजीकच्या धुंदलवाणीत तंबूंची व्यवस्था केली आहे.

Add Comment

Protected Content