जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथील सागर पार्क मैदानावर दि. १२ ते १४ एप्रिल दरम्यान संत गाडगेबाबा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी गोलंदाजांनी फलंदाजांना जखडून ठेवत दिवस गाजविला.
सकाळी ८ वाजता सामने सुरु करण्यात आले. पहिला सामना गाडगे बॉईज विरुद्ध परीट सुपर किंग्ज संघात झाला. परीट संघाने १११ धावांचे ठेवलेले आव्हान गाडगे बोईज संघाने एकही गडी न गमावता पूर्ण केले. तर दुसऱ्या सामन्यात मेहरूण धोबी पछाड संघाने दिलेले ११६ धावांचे आव्हान डेबूजी रॉयल्स संघ पेलू शकला नाही. यानंतर गाडगे वॉरियर्स विरुद्ध डेबूजी वॉरियर्स आणि जय गाडगे चॅम्पियन्स व गाडगे बॉईज संघात आणि शेवटी मेहरूण धोबी पछाड विरुद्ध गाडगे वॉरियर्स यांच्यात सामने झाले. रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही सामन्यांमध्ये चुरस पाहायला मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन संध्याकाळी सात वाजता दीपप्रज्वलन करून तसेच संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, सुमित्रा सोनवणे, युवा सेनेचे जीलाधिकारी शिवराज पाटील, आशुतोष पाटील, प्रभाकर खर्चे, रमेश सूर्यवंशी, अध्यक्ष अरुण शिरसाळे, संदीप बेडीस्कर, चेतन शिरसाळे, भास्कर वाघ, राजू सोनवणे उपस्थित होते.
स्पर्धेत “अ” गटात के के किंग्स मेहरूण इलेव्हन, गाडगे बॉईज, जय गाडगे चॅम्पियन्स, परीट सुपर किंग्स असे संघ असून “ब” गटात मेहरूण धोबी पछाड, गाडगे वोरीयर्स, डेबूजी रॉयल्स, डेबूजी वोरीयर्स हे संघ सहभागी झालेले आहेत.
स्पर्धेत दि.१३ रोजी ६ सामने खेळवले जाणार असून अंतिम दिवशी दि.१४ रोजी उपांत्य सामने, तृतीय बक्षिसांचा सामना आणि अंतिम सामना होणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी दिलीप शेवाळे, अरुण शिरसाळे, सुरेश ठाकरे, संदीप सोनवणे, चेतन शिरसाळे, दीपक बाविस्कर, प्रवीण आढाव, अविनाश देवरे, गणेश सुरसे, यशवंत सपकाळे, संतोष बेडिस्कर, मनोज निंबाळकर, गणेश सपके, सागर महाले, अँड.सतीश पवार, मयूर थोरात यांच्यासह आयोजन समिती परिश्रम घेत आहे.