संत गाडगेबाबा कॉलेजात चांद्रयानवर चर्चासत्र

charchasatra

भुसावळ प्रतिनिधी । येथील संत गाडगेबाबा अभियांत्रीकी महाविद्यालयात चांद्रयान-२ मोहिमेवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या चर्चासत्रात डॉ.गिरीश कुळकर्णी, प्रा.अनंत भिडे, प्रा. धीरज अग्रवाल, प्रा. सुलभा शिंदे, प्रा.नीता नेमाडे, प्रा.गजानन पाटील, प्रा.संतोष अग्रवाल, प्रा.दिपक खडसे, प्रा.निलेश निर्मल, प्रा.दिपक साकळे, प्रा.धीरज पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी इलेक्ट्रॉनीक्स अँड टेलीकम्युनिकेशन क्षेत्राचे ज्ञान व इलेक्ट्रॉनीक्स अभियंते येणार्‍या काळात पृथ्वीवरील मानवी जीवनाची पातळी एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातील. भारत आता इलेक्ट्रॉनीक्स वस्तूंचा फक्त सगळ्यात मोठा वापरकर्ता न राहता इलेक्ट्रॉनीक्स वस्तूंचा मोठा निर्माता बनण्याच्या दृष्टीने दमदार पाऊल टाकत आहे. हे सर्व बदल इलेक्ट्रॉनीक्स अँड टेलीकम्युनिकेशन क्षेत्रात अनेक रोजगार तसेच स्वयं रोजगाराच्या संधी निर्माण करून देणार असल्याची महिती प्रा. भिडे यांनी दिली.

तर याप्रसंगी चांद्रयान २ मोहिमीची माहिती देण्यात आली आहे. जीएसएलव्ही मार्क-३ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने प्रक्षेपण केलं जाणार आहे. यात ऑर्बटिर, लॅण्डर आणि रोव्हर हे तीन प्रमुख भाग असणार आहेत. या वेळी लँडर आणि रोव्हर या मोहमेत नव्याने सहभाग असणार आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आतापर्यंत कुणी गेलेले नाही, तिथे जाणार आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर पदार्थांचे माहिती संकलन करण्याचे डेटा पाठवण्याचे काम होईल. रोव्हर सौर ऊर्जेवर चालणारे असून त्याला ६-पाय आहे. त्याचे एकूण २० किलो वजन आहे. चंद्रयान-२ चं वजन ३२९० किलो असणार आहे. ऑर्बटिरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणं, कॅमेरा आण सेन्सर्स असणार आहेत अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.तर टेलीकम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना मोठी संधी असून पुढील तीन वर्षांत याक्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतील इस्रो व इतर नामांकित क्षेत्रात इलेक्ट्रॉनीक्स अँड टेलेकम्युनिकेशनच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना काम करण्याची मोठी संधी असणार आहे. येणार्‍या काळात सॅटेलाईट कम्युनिकेशन सोबतच इलेक्ट्रॉनीक्स हे अपरंपार संधींचे क्षेत्र म्हणूनही पुढे येणार आहे असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात विभाग प्रमुख डॉ.गिरीश कुळकर्णी यांनी केले.

Protected Content