पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील प्रथमच महानुभाव पंथातील दीक्षा विधी सोहळा चोरवड येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
धर्म सभामंडपाचे उद्घाटन परम पूज्य श्री आंबेकर बाबा जाळीचा देव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी परमपूज्य पंडित बाबा जाळीचा देव, परमपूज्य विश्वनाथ बाबा दर्यापूरकर व नगरसेवक पीजी पाटील उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक पीजी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलेला धर्माचा प्रचार प्रसार विचार हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्यामुळे आज या पंथकडे बरेच जण वळत आहे. चक्रधर स्वामी यांच्यानंतर आज समाज प्रबोधनाचे कार्य जे संत महंत गावोगावी जाऊन धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणावर करत आहे. त्यामुळेच आज आदर्श समाज निर्माण होत आहे व दीक्षारती यांनी संसार रुपी जीवनाचा त्याग करून जे आपल्या हातून समाजप्रबोधनाचे कार्य करणार आहात. त्या कार्यास व भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतो व कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आंबेकर बाबा यांनी दीक्षा कशासाठी घ्यावी व उपदेश कशासाठी घ्यावा व सद्भक्तांना समाज प्रबोधन आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमपूज्य सचिन बिडकर तर परम पूज्य मालेराजा बाबा राक्षस भुवन कर चोरवड यांनी आभार व्यक्त केले.