भुसावळ प्रतिनिधी । भुसावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपा-शिवसेना महायुतीचे उमेदवार आ. संजय सावकारे यांनी आज शनिवार रोजी शहरातून भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. या रॅलीमुळे राजकीय वातावरण अक्षरश ढवळून निघाले. या प्रचार रॅलीत पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी देखील सहभाग नोंदविला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जोश दिसून आला.
निवडणूक प्रचार कार्यालयापासून ही प्रचार रॅली काढण्यात आली. प्रचार रॅली अष्टभुजा देवी, नृसिंह मंदिर, सराफ बाजार, मॉडल रोड, लोखंडी पूल, सातारा ,आदी परिसरात फिरून निवडणूक प्रचार कार्यात विसर्जित करण्यात आली. प्रचार रॅली मध्ये प्रा. सुनील नेवे, नगरसेवक मनोज बियाणी, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, जि.प.सदस्य पल्लवी सावकारे, रजनी सावकारे, नगरसेविका चेतना महाजन, नगरसेविका प्रितमा गिरीश महाजन यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.