सुनेच्या पेजवरुन ट्रम्प यांचा व्हिडीओ पोस्ट ; फेसबुकचा पुन्हा दणका

 

वाशिंग्टन : वृत्तसंस्था । सून लारा ट्रम्प हिच्या फेसबुक पेजवर ट्रम्प यांनी व्हिडीओ पोस्ट केला होता. मात्र फेसबुकने हा व्हिडीओ काढून टाकला आहे. फेसबुकने व्हिडीओ हटवण्याबरोबरच यासंदर्भात इशाराही दिला आहे

 

अमेरिकेच्या कॅपिटल हिल्स येथे सहा जानेवारी रोजी झालेल्या हिंसेनंतर फेसबुकसहीतच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने प्रक्षोभक वक्तव्य केल्याचा ठपका ठेवत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंदी घातलीय. मात्र त्यानंतरही कधी ट्विटरला पर्यायी सोशल नेटवर्कींग साईट सुरु करण्यापासून ते अगदी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जाऊन सध्याच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका करण्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे ट्रम्प पुन्हा चर्चेत आहेत. असं असतानाच ट्रम्प यांनी केलेला असाच एक विचित्र प्रकार समोर आला असून बंदी घाल्यानंतरही त्यांनी चक्क सुनेच्या फेसबुक पेजवरुन आपल्या फॉलोअर्सची संवाद साधण्याचा प्रयत्न केलाय.

 

. लारा ट्रम्प यांच्या पेजवरुन डोनाल्ड ट्रम्प यांना साक्षात्कार झाल्याचा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. मात्र काही वेळातच फेसबुकने हा व्हिडीओ काढून टाकल्याचा मेल लारा यांना केला. या व्हिडीओत ट्रम्प यांचा आवाज असल्याने व्हिडीओ काढून टाकत आहोत असं कंपनीने लारा यांना कळवलं आहे. ट्रम्प यांच्या सुनेनेच त्यांची मुलाखत घेतली होती.

 

फेसबुकने लारा यांना दिलेल्या इशाऱ्यात, “आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही लारा ट्रम्प यांच्या फेसबुक पेजवरुन ती पोस्ट काढून टाकली आहे ज्यामध्ये माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आवाज आहे. आम्ही ट्रम्प यांचं फेसबुक तसेच इन्स्टाग्राम खातं बंद केलं आहे. या पुढेही आम्ही ट्रम्प यांचा आवाज असणारे व्हिडीओ काढून टाकण्याची कारवाई सुरु ठेऊ,” असं म्हटलं आहे. जानेवारी महिन्यामध्ये कॅपिटल हिल्स येथे अमेरिकन संसदेमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर फेसबुक, ट्विटर, स्नॅपचॅट तसेच युट्यूबनेही ट्रम्प यांच्यावर अनिश्चित काळासाठी बंदी घातली आहे. फेसबुकच्या कार्यकारी अधिकारी असणाऱ्या शेरिल सँडबर्ग यांनी तर ट्रम्प यांच्यावरील निर्बंध उठवण्याचा कंपनीचा सध्या काहीच विचार नाहीय असंही स्पष्ट केलं आहे.

 

 

 

पुढील काही महिन्यांमध्ये ट्रम्प स्वत:ची एखादी सोशल नेटवर्किंग साईट सुरु करण्याच्या विचारात आहे. “आमच्याकडे लवकर असा एक प्लॅटफॉर्म असेल की ज्या माध्यमातून आम्ही ट्रम्प यांचा संदेश अमेरिकेतील सर्व लोकांपर्यंत पोहचवू.” असा विश्वास या प्लॅटफॉर्मबद्दल बोलताना ट्रम्प यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केलाय.

Protected Content