ना. गुलाबराव पाटील यांच्या मुलाकडून अत्तरदे समर्थकांना मारहाण (व्हिडीओ)

marhan prakaran

जळगाव, प्रतिनिधी | धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे काल (दि.१८) रात्री १.३० वाजेच्या सुमारास शिवसेनेचे सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांचा मुलगा प्रताप पाटील, आबा माळी व पुतण्या यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांसह अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचार गाडीतील दोन कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप चंद्रशेखर अत्तरदे यांनी आज (दि.१९) पत्रकारांशी बोलताना केला.

 

उमेदवार अत्तरदे आणि मारहाण झालेले भाजपचे तालुका सरचिटणीस किशोर झवर यांनी दिलेल्या माहिती नुसार किशोर झवर व जिभाऊ पाटील हे दोघे रात्री जिभाऊ यांच्या वडिलांना दवाखान्यात नेण्यासाठी जात असताना पाळधी येथे रेल्वे गेटजवळ त्यांना अडवण्यात आले. त्याठिकाणी काही तरुणांनी त्यांना मारहाण केली, नंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले, तिथे राज्यमंत्री ना. पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील व आबा माळी यांनी पोलिसांसमोर त्यांना पुन्हा मारहाण केली. मारहाणीत जखमी असतानाही उपचारार्थ दवाखान्यात न नेता रात्रभर धरणगाव पोलिस स्टेशनला ताटकळत बसवून ठेवले. हे सगळे प्रकरण आपण भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या कानावर घातले असून पुढील कार्यवाही करीत असल्याचेही अत्तरदे यांनी यावेळी म्हटले आहे.

 

 

Protected Content