नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार संजय राऊत यांनी ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी पाचोरा तालुक्यातील कार्यक्रमात केलेल्या भाष्यावर खोचक टीका केली आहे.
पाचोरा तालुक्यातील लोहारी येथे बडगुजर समाजाच्या महाअधिवेशनात बोलतांना ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी शिवसेनेच्या विभाजनासाठी भाजपने केलेल्या प्रयत्नांचा गौप्यस्फोट केला होता. शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत यावर भाष्य केले आहे.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, गिरीश महाजन यांच्या बोलण्यावरून एक स्पष्ट झाले आहे, भारतीय जनता पक्षाचे जुनं स्वप्न होतं, शरद पवार यांचे स्वप्न नव्हतं. ते भारतीय जनता पार्टीचे होतं, त्यांच्या जे पोटात होतं ते ओठावर आले. त्यामुळे गिरीश महाजन यांचं मी अभिनंदन करेल असे संजय राऊत म्हणाले. तर, शिवसेना पक्ष तोडण्याचे काम केले जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय धोरण होते आणि त्यांनी ते राबविले, जे आमच्या खोके बहाद्दर चाळीस आमदारांना समजले नाही. ते चाळीस आमदार भाजपच्या कटात सहभागी झाले, त्यामुळे शिवसेना पक्ष फोडण्याचा कट अमलात आला असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार टिकास्त्र सोडले.