कटरच्या सहाय्याने हातातील सोन्याची बांगडी लांबविली !

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरने कट करून चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पोलीसांनी ताब्यात घेतले असून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रतिभा पुंडलिंक देसले (वय-२९) रा. हिवरखेडे ता. चाळीसगाव या महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवारी ९ जानेवारी रोजी त्या चाळीसगाव शहरात आलेल्या होत्या. दुपारी १२ वाजेच्या सुमारास चाळीसगाव बसस्थानकात बसमध्ये चढत असतांना संशयित आरोपी कुणाल सुनिल गायकवाड रा. अंबरनाथ ठाणे याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी कटरच्या मदतीने कट करून चोरून नेण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरड केल्यानंतर नागरीकांच्या मदतीने त्याला पकडले व चाळीसगाव शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी कुणाल गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिकारी दिपक बिरारी करीत आहे.

Protected Content